+91-7208479918
info@asmitatrust.org

जमनधार अग्रवाल माध्यमिक विद्यालय

‘अस्मिता’ या  सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेनंतर प्रथम अस्मिता विद्यालय प्राथमिक विभाग सुरू झाला, त्यानंतर सलग पाचवीचा वर्ग आणि 1983 मध्ये इयत्ता आठवीचा वर्ग सुरू केला. दहावीच्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच मार्च 86 ला उत्तीर्ण होऊन बाहेर पडली.

जगामध्ये तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागल्याने अस्मिताने 1994 मध्ये पाच संगणकाच्या साह्याने संगणक शिक्षण सुरू केले. आज शाळेमध्ये प्रत्येकी 25 संगणकासह 2 सुसज्ज कक्ष कार्यान्वित आहेत. प्रत्येक वर्गात ई लर्निंग आणि संगणक सुविधा उपलब्ध आहे.

पुढे अस्मिता विद्यालयाचे रूपांतर जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालयात झाले. शाळा जुन्या इमारतीतून आजगांवकर मैदानातील तीन मजली इमारतीत स्थलांतरित झाली. हायवेवरील वाहनांच्या वेगाने शाळेची प्रगती सुरू झाली…..

  • 2005 मध्ये ISO 9001-2000 प्रमाणपत्र मिळवणारी महाराष्ट्रातील मराठी माध्यमाची पहिली शाळा ठरली.
  • 2012 ते 2016 या कालावधीत National accreditation board for education and training (NABET) या  केंद्रीय संस्थेकडून आधिमानांकन मिळाले.
  • 2013 मध्ये मुख्याध्यापक मा. श्री ए.जी.पाटील सरांचा ‘ राष्ट्रीयआदर्श शिक्षक ‘पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान झाला.
  • 2016 मध्ये एल आय सी कडून बीमा-स्कूल  पुरस्कार मिळाला.
  • महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ शाळा पुरस्कार तसेच शिक्षक भारती तर्फे आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला.
  • 2016 मध्ये संगीत शिक्षिका कु. योगिता तांबे यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला.
  • धनुर्विद्या(Archery) मध्ये 

– सात वर्षे मुंबई महापौर चषक
– प्रबोधन चॅम्पियनशिप सतत दहा वर्षे
– पोईसर जिमखाना चषक
– तसेच कराटेमध्ये सतत सात वर्षे प्रबोधन ट्रॉफी प्राप्त.

  • सर्व शिक्षकांनी २०२०-२१ मध्ये ऑनलाइन शिक्षण परिणामकारक आणि उत्कृष्ट पद्धतीने १००%  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याने शिक्षक भारती तर्फे मुख्याध्यापक श्री संतोष फडतरे यांना अब्राहम लिंकन मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला.
  • अनेक विद्यार्थ्यांनी कराटे ,आर्चरी, स्किपिंग, मल्लखांब, जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात जिल्हा आणि राज्य पातळीवर अस्मिता चा ठसा उमटवला आहे.
  • श्री के.सी.पानेरिया यांच्या मार्गदर्शनातून अस्मिताच्या घोष पथकाने कॉमनवेल्थ गेम्सच्या ज्योती चे मुंबईमध्ये स्वागत केले आहे आहे. तालुका आणि जिल्हा स्तरावर बक्षिसे तसेच अनेक विद्यार्थी पोलीस आणि आर्मी मध्ये भरती झाले आहेत.
  • विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेल्या विषयाचे नीट आकलन होऊन सखोल ज्ञान मिळावे यासाठी शाळेमध्ये टिंकरिंग प्रयोगशाळा, गणित आणि भूगोल प्रयोगशाळा, कलादालन, संगीत, नृत्य हॉल इत्यादी अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत.
  • विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी व्यवसाय प्रशिक्षण आणि कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो.
  • विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशनाची सोय आहे.
  • 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण प्रभात फेरीचे आयोजन , तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास करण्याच्या दृष्टीने व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिराचे आयोजन गेले 35 वर्ष सातत्याने होत आहे.
  • माध्यमिक शालांत परिक्षेच्या निकालात प्रतिवर्षी प्रगती होत जाऊन मार्च 2020 मध्ये 100% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  • विद्यार्थ्यांसाठी गणित मंडळ, विज्ञान मंडळ ,निसर्ग मंडळ, आयटी क्लब वाड.मय मंडळ या मार्फत कला कला गुणांना वाव दिला जातो.
  • सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते.

अस्मिता तुन बाहेर प्रत्येक विद्यार्थी, सर्वगुणसंपन्न, सुजाण नागरिक व्हावा आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा यादृष्टीने संस्था, शिक्षक आणि सर्व सेवक अविरतपणे कार्यरत असतात..