SRPF कमांडंट श्रीम. मोक्षदा पाटील (IPS) यांनी विविध स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या यशाबाबत मुक्तपणे प्रश्न विचारले. यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
कोटक अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या उमंग या उपक्रमांतर्गत इ. सातवीचे विद्यार्थी Buddy Visit साठी CMN इटरंनॅशनल स्कूलमध्ये कला-धारा या उपमात सहभागी झाले.
अस्मिता संचालित जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालयातील विज्ञान मंडळांतर्गत, दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता जोगेश्वरी पूर्व श्याम नगर येथील लोकमान्य टिळक गणपती विसर्जन तलाव येथे स्वच्छता’अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सर्वांनी खूप उत्साहाने तलाव व परिसराची स्वच्छता केली. कागदाचे कपटे, प्लास्टिक बॉटल, झाडांचा पालापाचोळा,निर्माल्याची फुले इत्यादी कचरा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित केला. के पूर्व विभागातील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले. देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून श्रमाचे, स्वच्छतेचे व त्याबरोबर आरोग्याचे महत्व समजण्यास मदत झाली. तसेच स्वतःच्या जबाबदारीच्या जाणीवेबरोबर राष्ट्रीय कामात मोलाचा वाटा उचलला.